कानडा राजा पंढरीचा अभंग लिरिक्स - Kanada Raja Pandharicha Abhang Lyrics

कानडा राजा पंढरीचा अभंग लिरिक्स

वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा

परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा
कानडा राजा पंढरीचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
कानडा राजा पंढरीचा

Kanada Raja Pandharicha  Abhang Lyrics

Comments

Popular posts from this blog

गणेश जी के भजन -Ganesh Ji ke Bhajan

शिव जी के भजन - Shiv Ji ke Bhajan

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics