Posts

Showing posts with the label अभंग

भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी लिरिक्स - Bhakt Pundalika sathi Ubha Rahila Vitevari Lyrics

Image
भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी लिरिक्स भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी  धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवा विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ Bhakti Bhajan Song Details   Song  :- Bhakt Pundalika sathi Ubha Rahila Vitevari   Singer:- Shakuntala Jadhav   Lyrics  :-Sopan Kokate ऐसे ही सुन्द

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर लिरिक्स - Jagi Jiwanache Saar Ghyave Januni Satwar Lyrics

Image
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर लिरिक्स जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥  जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण, अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, Bhakti Bhajan Song Details   Song  :- Jagi Jiwanache Saar Ghyave Januni Satwar   Singer:- Prahlad Shinde   Lyrics  :-Anant Patil ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़ि

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा लिरिक्स - Amrutahuni God Naam Tuze Deva Lyrics

Image
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा लिरिक्स अमृताहुनी गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा का बा न घे ॥१॥ अमृताहुनी गोड....... सांग पंढरीराया काय करु यांसी । का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥ अमृताहुनी गोड....... किर्तनी बैसता निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥ अमृताहुनी गोड....... हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती । नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥ अमृताहुनी गोड....... Bhakti Bhajan Song Details   Song  :- Amrutahuni God Naam Tuze Deva   Singer:-    Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

ज्ञानाचा सागर लिरिक्स - Gyanacha Sagar Lyrics

Image
ज्ञानाचा सागर लिरिक्स ज्ञानाचा सागर ।  सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥  ज्ञानाचा सागर..... मरोनियां जावें ।  बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥ ज्ञानाचा सागर..... ऐसें करी माझ्या भावा ।  सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥ ज्ञानाचा सागर..... जावें वोवाळुनी ।  जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥ ज्ञानाचा सागर..... Bhakti Bhajan Song Details   Song  :- Gyanacha Sagar   Singer:- jyoti pawar   Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं लिरिक्स - Pandhariche Sukh Nahi Tribhuwani Lyrics

Image
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं लिरिक्स पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।  प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे पंढरीचे सुख नाहीं...   त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिण मुख वाहात चंद्रभागा पंढरीचे सुख नाहीं...   सकळ संतांचा मुकुटमणी देखा । पुंडलिक सखा आहे जेथें पंढरीचे सुख नाहीं...   चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकांसी अखंडित पंढरीचे सुख नाहीं... Bhakti Bhajan Song Details   Song  :- Pandhariche Sukh Nahi Tribhuwani   Singer:- yashshri Mohite   Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

सुखाचे चांदणे लिरिक्स - Sukhache Chandne Lyrics | Aai Kuthe Kay Karte

Image
सुखाचे चांदणे लिरिक्स मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले टिपूर से… सुखाचे चांदणे कोण या वेड्या मनाला आस लावी भाबडी कोण आहे ज्यामुळे हे उंबऱ्याला लांघणे ही नवी सुरुवात आहे की नवे आभास हे दूरवरची ती निळाई मागते… सुखाचे चांदणे भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते गायिले मि अंतरीच्या वेदनांचे हुंदके हरवलेली स्वप्नं होती थबकलेली पाऊले पण तुझ्या भेटीत गवसले… सुखाचे चांदणे Bhakti Bhajan Song Details   Song  :- Sab Jhumo Nacho wo Aane wala Hai   Singer:- विद्या करलगीकर   Lyrics  :-  श्रीपाद अरुण जोशी ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

विठ्ठल नामाची शाळा भरली लिरिक्स -Vitthal Namachi Shada Bharali Lyrics

विठ्ठल नामाची शाळा भरली लिरिक्स विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकतांना ताण-भूख हरली गुरू होई पांडुरंग आम्हा शिकवी तुक्याचे अभंग नाम गजरात होऊ दंग पोती पाण्यात कशी तरली विठ्ठल नामाची शाळा भरली बाळ गोपाळ होऊ वारकरी डोळे मिटून बघू पंढरी कधी घडल पंढरीची वारी एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली टाळ-चिपळ्या हाती घ्या रे करू गजर नाचूया रे खेळ वारीचा बघती सारे भक्ती पुढे ही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली लिरिक्स -Vitthal Namachi Shada Bharali Lyrics Bhakti Bhajan Song Details   Song  :- Vitthal Namachi Shada Bharali   Singer:-     Lyrics  :-  ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

नये भजन आप यहाँ से देख सकते है

Show more