धुंद झाला तुझा दरबार अभंग लिरिक्स - Dhund Jhala Tujha Darbar Abhang Lyrics
धुंद झाला तुझा दरबार अभंग लिरिक्स
धुंद झाला तुझा दरबार |धुंद झाला तुझा दरबार ||धृ ||
पुण्यवंत पाताळ लोकी नेला |
दारिद्र्य तो भाग्यवान केला | |
चोरट्यांचा बहुमान वाढविला |
कीर्ती वाणांचा अपमान केला ||
धुंद झाला तुझा दरबार |
धुंद झाला तुझा दरबार || १ ||
वैरी अशी दिधली मोक्ष सिद्धी |
कपटीया दिली महानिदी ||
सेवकांच्या ढुंगा न मिळे चिंधी |
चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी ||
धुंद झाला तुझा दरबार |
धुंद झाला तुझा दरबार || २ ||
पतीव्रता ती वृथा गुंतविली |
वेश्या गणिका ती सत्यलोका ||
कळी स्वकुळा लावियेली यादवृंदा |
ही गोष्ट बरी नाही केली ||
धुंद झाला तुझा दरबार |
धुंद झाला तुझा दरबार || ३ ||
सत्यवानाचा बहू केला छळ |
कीर्ती वाणाचे मारियेले बळ ||
सखा म्हणवीसी नासे त्याचे बळ |
जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ ||
धुंद झाला तुझा दरबार |
धुंद झाला तुझा दरबार || ४ ||
Marathi Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें