तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो गौळण लिरिक्स - Tujha Krishna Murari Majhi Chhed Kadhito Gavlan Lyrics
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो गौळण लिरिक्स
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो //ध्रु//
बाजारी जाता घोर वाटे जीवाला
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
दही दूध चोरून माझा घडा फोडीतो
तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढीतो //1//
जमवूनी गोपि राधा सांगे गवळणीना
गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा
गोठातल्या गाई म्हशी तो ग सोडीतो
तुझा कृष्ण सावळा ग माझी छेड काढतो//2//
यशोदा म्हणे आता बांधुनी उखळला
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
विनवूनी त्याला आज हात जोडीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो //3//
Krishnacha marathi gavlan Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें