कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा लिरिक्स - Kanhavin Radha An Radhevin Kanha Lyrics
कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा लिरिक्स ओढ अंतरी सख्या श्रीहरी तुझी आठवण छळते मोहना सांग रे कान्हा काय घडला गुन्हा कर भेटीचा नवा बहाणा कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा कोण करील कल्पना....!! ध्रु!! तुझ्यासाठी आतुर मी भावनांचा मोर पिसारा ... साद घाली प्रेमाची कालिंदिचा रम्य किनारा... नित्य नेहमी वाट पाही वृंदेचा रानवारा .. सावराया ये रे माझ्या आयुष्याचा हा पसारा .. भुलले तुला मी.. भाळले तुला मी.. तुझ्या माझ्या प्रेमाचे मृगजल न्हवते ना?.. !!१!! कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा कोण करील कल्पना....!! विसरून गेलास परवा शेला नदीकाठी.. भेटीची ती खूण होती का रे माझ्यासाठी .. नाद वेणूचा अलवार देई चैतन्याची मिठी .. सारथी तू माझा असता उरली कुणाची ना भीती.. जाणते तुला मी, मानते तूला मी.. उमलूनी येती अशा माझ्या प्रेम भावना..!!२ मुरली वाले ने घेर लई अकेली पनिया गई लिरिक्स राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग लिरिक्स रडु नको बाळा मी पाण्याला जाते लिरिक्स असा कसा देवाचा देव बाई ठकडा लिरिक्स Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण Song :- Kanhavin Radha An Radhevin Kanh...