रडू नको बाळा जरा झोप घे ना गवळण लिरिक्स - Radu Nako Bala Jara Zop Ghe Na Gavalan Lyrics
रडू नको बाळा जरा झोप घे ना गवळण लिरिक्स
श्याम सुंदरा मनमोहनारडू नको बाळा जरा झोप घे ना || धृ ||
सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी |
हलवीत बसली यशोदा मंदिरी ||
नानापरी विनविते मागील ते खाया देते |
विनवू किती मोहना ||
रडू नको बाळा जरा झोप घे ना || १ ||
आठवा अवतार चक्रपाणी |
अवतार घेतील ग गोकळी येऊनी ||
नानापरी विनविते मागील ते खाया देते |
विनवू किती मोहना |
रडू नको बाळा जरा झोप घे ना || २ ||
एका जनार्दनी कालिया मातला|
त्याच्या डोईवर बाळकृष्ण नाचला ||
नानापरी विनविते मागील ते खाया देते |
विनवू किती मोहना |
रडू नको बाळा जरा झोप घे ना || ३ ||
Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें