Posts

Showing posts with the label अभंग

विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला लिरिक्स - Vitthal To Aala Aala Mala Bhetnyala Lyrics

Image
विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला लिरिक्स विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला मला भेटण्याला आला, मला भेटण्याला तुळशीमाळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला सत्य वाचा माझी होती, वाचली न गाथा पोथी घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्ती शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला Bhakti Bhajan Song Details   Song  :- Vitthal To Aala Aala Mala Bhetnyala   Singer:- Lata Mangeshkar   Lyrics  :-P.Savalaram ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स - Vitthala Tu Veda Kumbhar Lyrics

Image
विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स फिरत्या चाकावरती  देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार ! माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला  नसे अंत ना पार ! विठ्ठला तू वेडा कुंभार   घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी  कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार   तूच घडविसी तूच फोडिसी कुरवाळिसि तू तूच ताडिसी न कळे यातुन काय जोडिसी? देसी डोळे परि निर्मिसी  तयांपुढे अंधार ! विठ्ठला तू वेडा कुंभार Bhakti Bhajan Song Details   Song  :- Vitthala Tu Veda Kumbhar    Singer:- Sudhir Phadke   Lyrics  :-G.D.Madgulkar ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स - Dehachi Tijori Bhaktichach Thewa Lyrics

Image
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य, अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा Bhakti Bhajan Song Details   Song  :- Dehachi Tijori Bhaktichach Thewa   Singer:- Sudhir Phadke   Lyrics  :-Jagdish Khebudkar ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी

शोधिसी मानवा राऊळी मंदिरी लिरिक्स - Shodhishi Manawa Raudi Mandiri Lyrics

Image
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी लिरिक्स शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी  सूर येती कसे, वाजते बासरी  रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी गंध का हासतो, पाकळी सारुनी  वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी भोवताली तुला, साद घाली कुणी खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी भेटतो देव का, पूजनी अर्चनी  पुण्य का लाभते, दानधर्मातुनी  शोध रे दिव्यता, आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी  Bhakti Bhajan Song Details   Song  :- Shodhishi Manawa Raudi Mandiri    Singer:- Mohammed Rafi   Lyrics  :-Vandana Vitankar ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

कांदा मुळा भाजी अवघीं विठाई माझी लिरिक्स - Kanda Muda Bhaji Awaghi Vithai Majhi Lyrics

Image
कांदा मुळा भाजी अवघीं विठाई माझी लिरिक्स कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाई माझी ॥१॥ लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥२॥ ऊस-गाजर-रातळू । अवघा झालासें गोपाळू ॥३॥ मोट-नाडा-विहींर-दोरी अवघीं व्यापिली पंढरी सावता म्हणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥ Bhakti Bhajan Song Details   Song  :- Kanda Muda Bhaji Awaghi Vithai Majhi   Singer:- Dnyaneshwar Meshram   Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

अवघे गर्जे पंढरपूर लिरिक्स - Avaghe Garje Pandharpur Lyrics

Image
अवघे गर्जे पंढरपूर लिरिक्स अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर अवघे गर्जे पंढरपूर   टाळघोष कानी येति ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहलो हो चंद्रभागा नीर अवघे गर्जे पंढरपूर इडापिडा टळुनी जाती देहाला या लाभे मुक्ती नामरंग रंगले हो संतांचे माहेर अवघे गर्जे पंढरपूर   देव दिसे ठाईं ठाईं भक्त लीन भक्तीपायी सुखालागी आला या हो आनंदाचा पूर अवघे गर्जे पंढरपूर Bhakti Bhajan Song Details   Song  :- Awaghe Garje Pandharpur    Singer:- Mahesh Hiremath   Lyrics  :- ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह

खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन लिरिक्स - Khandobachi Karbharin Jhali Banu Dhangarin Lyrics

Image
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन लिरिक्स असा कसा हा देव येडा झाला पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझीच पार्वती तीच हि बानू बाई येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो देव अधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला होता तिचा पण आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात राहून साऱ्या धनगरात खातोय भातामध्ये ताक ध्यास होता मनी तिला वाचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीच्या खुनी त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन ..... जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा तोच आदीनाथ त्यांनी दावली

नये भजन आप यहाँ से देख सकते है

Show more