मोजता येत नाही मापा न एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न भजन लिरिक्स - Mojta Yet Nahi Mapa na Yevadh Vaibhav Dilay Pandhurnaga Na Bhajan Lyrics
मोजता येत नाही मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न भजन लिरिक्स
फिल्मी तर्ज - दूल्हे का सेहरा सुहाना लगता हैमोजता येत नाही मापान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न ||धृ||
पेढा नाही बर्फी नाही नाही साखर
पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर
गोड फुटाणे प्रसाद घ्यावा भक्तान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न
मोजता येत नाही मापान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न || १ ||
टाळ नाही विना नाही नाही मृदुंग
पांडुरंगाच्या पुण्याई ना मिळेल सत्संग
सत्संगचा लाभ घ्यावा भक्तान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न
मोजता येत नाही मापान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न || २ ||
पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट
पांडुरंगाच्या पुण्याईन तरेल आयुष्य
जीवनात सूख आणलंय माऊलीन
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न
मोजता येत नाही मापान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न ||३||
भक्त जनाची पुण्याई आली फळाला
एक वेळा दासी होऊन सांगेन सर्वांना
एक वेळा जाऊन या हो पंढरीला
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न
मोजता येत नाही मापान
एवढं वैभव दिलंय पांडुरंगा न || ४ ||
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें