चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा गं लिरिक्स - Chumbal Motyachi Var Panyacha Ghada Ga Lyrics
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा गं लिरिक्स
मुखडा:चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग
कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ धृ ॥
कडवे १:
पहिल्या दिवशी आणले दूध
हरवली माझी सुध आणि बुध
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग
कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ १ ॥
कडवे २:
दुसऱ्या दिवशी आणले ताक
कृष्णदेवाने मारिली हाक
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग
कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ २ ॥
कडवे ३:
तिसऱ्या दिवशी आणले लोणी
कृष्णदेवाने ओढली वेणी
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग
कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ ३ ॥
कडवे ४:
चौथ्या दिवशी आणले तूप
कृष्णदेवाने दाविले रूप
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग
कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ ४ ॥
कडवे ५:
एका जनार्दनी झाले मी धुंद
कृष्णदेव आहे आनंदकंद
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा ग
कृष्णदेवाने हळूच मारला खडा ग ॥ ५ ॥
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें