तुम्ही संत मायबाप कृपावंत लिरिक्स - Tumhi Sant Maaybaap Krupavant Lyrics
तुम्ही संत मायबाप कृपावंत लिरिक्स
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥
अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥२॥
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं
वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें