घालीन लोटांगन वंदीन चरण आरती लिरिक्स - Ghalin Lotangan Vandin Charan Aarti Lyrics
घालीन लोटांगन वंदीन चरण आरती लिरिक्स
घालीन लोटांगन, वंदीन चरण,डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ।।
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन,
भावें ओवाळिन म्हणे नामा ।। १ ।
त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्चसखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
बुध्दयात्मना वा प्रकृतीस्वभावात् ।
करोमी यद्यत्सकलं परस्मै,
नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥
अच्युतं केशवंरामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥