मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स - Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पावदेव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।
देव बाजारचा... ....॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा.........॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा... ......॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा..........॥४॥
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics
Tukadoji Maharaj marathi abhang
अभंग - मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
गीत - संत तुकडोजी महाराज,
संगीत - विलास पाटील,
गायक - अजित कडकडे,
निर्माता - सुभाष परदेशी .
"असेच काही निवडक आणि सुंदर अभंग ऐका/वाचा"
Jain bhajan taka
जवाब देंहटाएंUh
जवाब देंहटाएं