मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स - Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पावदेव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।
देव बाजारचा... ....॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा.........॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा... ......॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा..........॥४॥
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
Mani Nahi Bhav Mane Deva Mala Pav Lyrics
Tukadoji Maharaj marathi abhang
Lyrics - Sant Tukadoji Maharaj
मराठी अभंग लिरिक्स
- विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
- अबीर गुलाल उधळीत रंग अभंग मराठी लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर मराठी भजन
- विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
- ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
- एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
- नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स
Jain bhajan taka
जवाब देंहटाएं