अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स - Abir Gulal Udhalit Rang lyrics
अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,
पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
इसी तरह के नए भजनों की सूचि आप यहाँ पर देख सकते है
मराठी अभंग लिरिक्स (भजन )
- विसरू नको रे आई बापाला मराठी भजन लिरिक्स
- धरिला पंढरीचा चोर मराठी भजन
- मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव लिरिक्स
- विठ्ठलाच्या पायी वीट मराठी अभंग लिरिक्स
- भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी अभंग लिरिक्स
- ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
- एक वेळ करी या दुःखा वेगळे मराठी अभंग लिरिक्स
- नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ मराठी अभंग लिरिक्स
अबीर गुलाल उधळीत रंग अभंग लिरिक्स मराठी
Abir Gulal Udhalit Rang Natha Ghari Nache Majha Sakha Pandurang
Abhang lyrics in Marathi
I like it
जवाब देंहटाएंKhup Chan
जवाब देंहटाएं