विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स - Vitthala Tu Veda Kumbhar Lyrics
विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स
फिरत्या चाकावरतीदेसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार !
माती पाणी उजेड वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
विठ्ठला तू वेडा कुंभार !
माती पाणी उजेड वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत ना पार !
विठ्ठला तू वेडा कुंभार
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार !
विठ्ठला तू वेडा कुंभार
तूच घडविसी तूच फोडिसी
कुरवाळिसि तू तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी?
देसी डोळे परि निर्मिसी
तूच घडविसी तूच फोडिसी
कुरवाळिसि तू तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी?
देसी डोळे परि निर्मिसी
तयांपुढे अंधार !
विठ्ठला तू वेडा कुंभार
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें