तळवे तळहात टेकीत लिरिक्स - Tadave Tadhat Tekit Lyrics
तळवे तळहात टेकीत लिरिक्स
तळवे तळहात टेकीत |डाव्या गुडघ्याने रांगत |
रंगानी रंगनाथ |
रंगानी रंगनाथ |
तो म्यां देखिला सये || १ ||
गवळण जसवंती पैसांगे |
गवळण जसवंती पैसांगे |
आलेवर कृष्णाचेनि मांगे |
येणे येणे वो श्रीरंगें
येणे येणे वो श्रीरंगें
नवनीत माझे भक्षिलें || २ ||
एक्या हाती लोण्याचा कवळु |
एक्या हाती लोण्याचा कवळु |
मुख माखले आळु माळू |
चुंबन देता येतो परिमळू |
चुंबन देता येतो परिमळू |
नवनिताचा ये सये || ३ ||
येणे माझे कवाड उघडिले |
येणे माझे कवाड उघडिले |
येणे शिंके हो तोडिले |
दह्या दुधात भक्षिलें |
दह्या दुधात भक्षिलें |
उलानदीले ताकाते || ४ ||
ऐसे जरी मी जाणते |
ऐसे जरी मी जाणते |
यमुनापाणीया नाव जाते |
धरुनी खांबासी बांधिते |
धरुनी खांबासी बांधिते |
शिक्षा लाविते गोविंदा || ५ ||
एस पुराण प्रसिद्ध चोर |
एस पुराण प्रसिद्ध चोर |
केशव नाम्याचा दातार |
पंढरपुरी उभा विटेवर |
पंढरपुरी उभा विटेवर |
भक्त पुंडलिकासाठी || ६ ||
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें