वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स - Wakun Taak Sada G Radhe Jara gavlan Lyrics
वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स
वाकून टाक सडा,गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।। धृ ।।
केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध जुड़ा, गं राधे जरा,
केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध जुड़ा, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।१।।
शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा,
शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।२।।
गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा,
गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।३।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा,
एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।४।।
वाकून टाक सडा गवळण लिरिक्स मराठी -
Wakun Taak Sada gavlan Lyrics Marathi
Vakun Tak Sada ·
Singer - Surykant Shinde
Kanha god god boltayg gavlan
जवाब देंहटाएंSir ye govlan eknath maharaj chi nahi
जवाब देंहटाएं