कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा लिरिक्स - Kanhavin Radha An Radhevin Kanha Lyrics

कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा लिरिक्स

ओढ अंतरी सख्या श्रीहरी
तुझी आठवण छळते मोहना
सांग रे कान्हा काय घडला गुन्हा
कर भेटीचा नवा बहाणा

कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा
कोण करील कल्पना....!! ध्रु!!

तुझ्यासाठी आतुर मी भावनांचा मोर पिसारा ...
साद घाली प्रेमाची कालिंदिचा रम्य किनारा...
नित्य नेहमी वाट पाही वृंदेचा रानवारा ..
सावराया ये रे माझ्या आयुष्याचा हा पसारा ..
भुलले तुला मी.. भाळले तुला मी..
तुझ्या माझ्या प्रेमाचे मृगजल न्हवते ना?.. !!१!!

कान्हावीण राधा अन राधेवीण कान्हा
कोण करील कल्पना....!!

विसरून गेलास परवा शेला नदीकाठी..
भेटीची ती खूण होती का रे माझ्यासाठी ..
नाद वेणूचा अलवार देई चैतन्याची मिठी ..
सारथी तू माझा असता उरली कुणाची ना भीती..
जाणते तुला मी, मानते तूला मी..
उमलूनी येती अशा माझ्या प्रेम भावना..!!२


Krishna chi Marathi Gavalan  Bhakti Bhajan गौळण

 Song  :- Kanhavin Radha An Radhevin Kanha

 Singer:- Sakshi Kokate

 Lyrics  : Pundalik Chaughule





टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )