विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स - Vitthala Tu Veda Kumbhar Lyrics
विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार ! माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ! विठ्ठला तू वेडा कुंभार घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडविसी तूच फोडिसी कुरवाळिसि तू तूच ताडिसी न कळे यातुन काय जोडिसी? देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार ! विठ्ठला तू वेडा कुंभार Bhakti Bhajan Song Details Song :- Vitthala Tu Veda Kumbhar Singer:- Sudhir Phadke Lyrics :-G.D.Madgulkar ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है गणेश जी के भजन विट्ठलाचे अभंग मराठी राधा कृष्ण के भजन कृष्णाच्या गवळणी मराठी शिव जी के भजन गुरुदेव के भजन माता रानी के भजन दादाजी धुनिवाले के भजन साईं बाबा के भजन देश भक्ति गीत राम जी के भजन फ़िल्मी तर्ज पर भजन हनुमान जी के भजन बधाई गीत आरति संग्रह चालीसा संग्रह