देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स - Dehachi Tijori Bhaktichach Thewa Lyrics
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा लिरिक्स
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
Bhakti Bhajan Song Details
Auspicious, excellence
जवाब देंहटाएंImpressive and powerful suggestion by the author of this blog are really helpful to me.Gun Safe Dehumidifier
जवाब देंहटाएं