शोधिसी मानवा राऊळी मंदिरी लिरिक्स - Shodhishi Manawa Raudi Mandiri Lyrics
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी लिरिक्स
शोधिसी मानवा, राऊळी मंदिरीनांदतो देव हा, आपुल्या अंतरी
मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी
सूर येती कसे, वाजते बासरी
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी
गंध का हासतो, पाकळी सारुनी
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी
भोवताली तुला, साद घाली कुणी
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी
भेटतो देव का, पूजनी अर्चनी
पुण्य का लाभते, दानधर्मातुनी
शोध रे दिव्यता, आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें