चांदण चांदण झाली रात लिरिक्स - Chandan Chandan Zali Raat Lyrics
चांदण चांदण झाली रात लिरिक्स
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
पुण्याचा सोनार बोलवा ग
आईला नथनि घडावा ग .....
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
ठाण्याचा कासार बोलवा ग
आईला बांगड्या भरा ग .....
लिंब ग नारळाच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
रायगड चा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूल घडावा ग .....
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट .....
चांदण चांदण झाली रात मराठी लोकगीत लिरिक्स
Chandan Chandan Zali Raat Marathi Lokgeet Lyrics
Singer - Bharti Madhavi
Comments
Post a Comment