विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स - Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, 
विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, 
विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, 
विठ्ठला मायबापा

विठुमाऊली तू माऊली जगाची अभंग लिरिक्स मराठी 
Vithumauli Tu Mauli Jagachi Abhang Lyrics marathi

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

ओ पापी मन करले भजन लिरिक्स - O Papi Man Karle Bhajan Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics