एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स - Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स


एकतारी संगे एक रूप झालो । 
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ॥धृ॥

गळामाळ शोभे आत्मरूप शांती, 
भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती । 
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ॥१॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो 

भुकभाकरीची छाया झोपडीची 
निवार्‍यास द्यावी उब गोदडीची । 
माया मोह सारे उगाळूनी प्यालो ॥२॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो 

पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख प्याला 
कुणी राव होई कुणी रंक झाला । 
मागणे न काही सांगण्यास आलो ॥ ॥३॥
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो 

एकतारी संगे एक रूप झालो । 
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ||

एकतारी संगे एक रूप झालो अभंग लिरिक्स मराठी 
Ek Tari Sange Ek Roop Zalo Abhang Lyrics Marathi
Song : Ektari Sange Ekroop Jhalo 
Singer : Sau.Dhepetai 
Music : Dashrath Pujari 
Lyrics : Ramesh Anavkar

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics