कानडा राजा पंढरीचा लिरिक्स - Kanada Raja Pandharicha Lyrics
कानडा राजा पंढरीचा लिरिक्स
कानडा राजा पंढरीचावेदांनाही नाही कळला
अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा
परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा
Singer -Mahesh Kale
Lyricist: G. D. Madgulkar
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें