सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स - Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स
सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Sundar Te Dhyan Ubhe Vitewari Lyrics Marathi
कृपया अभांग का हिंदी ट्रांसलेट भी बताए
जवाब देंहटाएं