Sun Raha Hu Bhajan Ka Nam Boliye
🎤 प्रमुख भजन गायक

आरती नागद्वारा लिरिक्स - Aarti Nagdwara Lyrics

आरती नागद्वारा लिरिक्स 

आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, 
सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । 
आरती नागद्वारा ।।धृ ।।

मेरुच्या शिखरी जडले, सिंहासन भारी । 
त्यावर बैसुनिया, सृष्टी रचली या सारी ।।१।।
आरती नागद्वारा......

श्रीराम अवतारी, बंधू लक्ष्मण होशी । 
पाळली राम आज्ञा, पुर्ण कार्य तू करशी ।।२।।
आरती नागद्वारा......

श्रीकृष्ण अवतारी, ज्येष्ठ बंधू बळीराम । 
प्रताप थोर होतो, जगी मिळविले नाव ।।३।।
आरती नागद्वारा......

श्रावण महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र । 
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।४।।
आरती नागद्वारा......

शेष सिंधु सागरात, शेषसाई अनंत । 
तेथे तुम्ही नांदता हो, ज्याला म्हणतात लक्ष्मीकांत ।।५।।
आरती नागद्वारा......

कालीया नांव तुझे, घेता उतरले ओझे । 
स्मरण केली या हो, देवा सार्थक होई माझे।।६।।
आरती नागद्वारा......

देवा मी ज्ञान धरीले, दुःख माझे हरीले । 
हरीला सेवा केली, शंकर मजला पावले ।।७।।
आरती नागद्वारा......

वैशाख महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र । 
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।८।।
आरती नागद्वारा......

आज देव शेषराये, भक्ती तुझी पुर्ण होय । 
नवखंड पृथ्वीशी, देवा भरुनी आला आहे ।।९।।
आरती नागद्वारा......

पाचतत्व पंच ज्योती, ओवळीले नागनाथा । 
भक्तजन आरत्या गावी, जागा चारणापाशी द्यावी ।।१०।।
आरती नागद्वारा......

आरती नागद्वारा, गणेश गायन करी । 
नित्य नेम महाभारी, सर्वदिन सेवा करी ।।११।।
आरती नागद्वारा......



नागद्वारची आरती मराठी - 

🌸 भजन विवरण(Bhajan Details)
🎵 भजन का नामआरती नागद्वारा
🎤 गायक Shankar Marbate
✍️ लेखक पारंपरिक
📂 श्रेणी नागद्वारची आरती मराठी

टिप्पणियाँ

  1. आरती नागद्वारा जरा चुकलेली आहे ,"वैशाख महिन्यात दिवस पौर्णिमा रात्र " अस असायला पाहीजे, तिथे नागपंचमी रात्र अस लिहिलेले आहे , कृपया आरती पुनः अपडेट करावी ,धन्यवाद

    जवाब देंहटाएं
  2. हळद लागलीरे मया शंभु देवले

    जवाब देंहटाएं

एक टिप्पणी भेजें