नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची लिरिक्स- Nesali g bai Mi Chandrakala thipkyachi Lyrics
नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची लिरिक्स
नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची.बाई ठिपक्याची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,
शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा.
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा.
शर्त झाली बाई याची निर्लजपणाची,
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
पाणीयाशी जात बाई, वाटेवरी उभा कान्हा.
सोड देवा पदर माझा, नार आहे परक्याची.
या कान्हा ची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
अजून याला नाही कळे करी तसे भलते चाळे.
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची.
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
एका जनार्दनी गवळण हासुनी,
हरी चरणाशी मिठी मारूनी.
फिटली ग बाई माज्या, हौस या मनाची.
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.
लिरिक्स: संत एकनाथ महाराज
कृष्ण गवळण मराठी
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची लिरिक्स
Nesali g bai Mi Chandrakala thipkyachi tirapi najar majhyawar tya savdya hari chi Lyrics
जय खटेश्वर महाराज 👌🚩🚩🚩👏
जवाब देंहटाएंजय श्री कृष्ण
जवाब देंहटाएं