बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लिरिक्स - Bolava Vitthal Pahava Vitthal Lyrics
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लिरिक्स
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल लिरिक्स - Bolava Vitthal Pahava Vitthal Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें