माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स - Majha Bhav Tujhe Charani Lyrics
माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स
माझा भाव तुझे चरणीं ।तुझें रूप माझे नयनीं
सापडलों एकामेकां ।
जन्मोजन्मीं नोहे सुटका
त्वां मोडिली माझी माया ।
मी तो जडलों तुझिया पायां
त्वां मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयीं
नामा ह्मणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविलें कोणा
माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स - Majha Bhav Tujhe Charani Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें