सुखाचे चांदणे लिरिक्स - Sukhache Chandne Lyrics | Aai Kuthe Kay Karte
सुखाचे चांदणे लिरिक्स
मोरपंखी चाहुलींचेसोबतीने चालणे
अंतरावर पसरलेले
टिपूर से… सुखाचे चांदणे
कोण या वेड्या मनाला
आस लावी भाबडी
कोण आहे ज्यामुळे हे
उंबऱ्याला लांघणे
ही नवी सुरुवात आहे
की नवे आभास हे
दूरवरची ती निळाई
मागते… सुखाचे चांदणे
भोवतीचे सूर हळवे
ऐकताना वाटते
गायिले मि अंतरीच्या
वेदनांचे हुंदके
हरवलेली स्वप्नं होती
थबकलेली पाऊले
पण तुझ्या भेटीत
गवसले… सुखाचे चांदणे
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें