भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी लिरिक्स - Bhakt Pundalika sathi Ubha Rahila Vitevari Lyrics

भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी लिरिक्स

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी 
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२

तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट
आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट
भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२

एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली
कान्होपात्राला देवान मंदिरात जागा दिली
संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२

सखुबाई जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई
त्यांचे अभंग ऐकुनी मन आनंदित होई
हरी नामाच्या गजरात सुख मिळेल संसारी
धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी
धनी मलाही दाखवा विठूरायाची पंढरी
तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२

Bhakti Bhajan Song Details

 Song  :- Bhakt Pundalika sathi Ubha Rahila Vitevari

 Singer:- Shakuntala Jadhav

 Lyrics  :-Sopan Kokate

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

गणेश जी के भजन लिरिक्स - Ganesh Ji ke Bhajan Lyrics ( Ganpati Ji Ke bhajan lyrics ) Bhajan List

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )