जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर लिरिक्स - Jagi Jiwanache Saar Ghyave Januni Satwar Lyrics

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर लिरिक्स

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥ 
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥

क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट,
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट,
देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण,
मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान,
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण,
क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण,
अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

Bhakti Bhajan Song Details

 Song  :- Jagi Jiwanache Saar Ghyave Januni Satwar

 Singer:- Prahlad Shinde

 Lyrics  :-Anant Patil

Comments

नये भजन आप यहाँ से देख सकते है

Show more

Popular posts from this blog

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

कृष्ण भगवान के भजन लिरिक्स - Krishna Bhajan Lyrics

गणेश जी के भजन लिरिक्स - Ganesh Ji ke Bhajan Lyrics ( Ganpati Ji Ke bhajan lyrics ) Bhajan List