खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन लिरिक्स - Khandobachi Karbharin Jhali Banu Dhangarin Lyrics
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन लिरिक्स
असा कसा हा देव येडा झाला पहा कशी नवलाईशिव अवतारी तुझीच पार्वती तीच हि बानू बाई
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा विजय असो
देव अधिपती कशी हरली त्याची मती
एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....
जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला
जाऊन चंदनपुराला पाहतोय बानूच्या घराला
भुरळ पडली येडा झाला देव भुलूनी कसा गेला
होता तिचा पण आला पूर्ण तो करून
तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळीन
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....
बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात
बानूला ठेउनी मनात जागुनिया दिनरात
राहून साऱ्या धनगरात खातोय भातामध्ये ताक
ध्यास होता मनी तिला वाचनात गुंतुनी
म्हणे होतो मी तुझा धनी जानी अंतरीच्या खुनी
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....
जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा
जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा
योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा
तोच आदीनाथ त्यांनी दावली जगी रीत
तीच आली कलियुगात सांगे साऱ्याला चंदन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....
देव अधिपती कशी हरली त्याची मती
एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन
त्या खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन
खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन .....
Bhakti Bhajan Song Details
Comments
Post a Comment