पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं लिरिक्स - Pandhariche Sukh Nahi Tribhuwani Lyrics
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं लिरिक्स
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे
पंढरीचे सुख नाहीं...
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा
पंढरीचे सुख नाहीं...
सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।
पुंडलिक सखा आहे जेथें
सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।
पुंडलिक सखा आहे जेथें
पंढरीचे सुख नाहीं...
चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित
चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित
पंढरीचे सुख नाहीं...
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें