घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे लिरिक्स - Gheta Naam Vithobache Parvat Jadati Papache Lyrics
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे लिरिक्स
घेता नाम घेता नाम विठोबाचेपर्वत जळती पापांचे ||
ऐसा नामाचा महिमा |
वेद शिणला झाली सीमा ||
घेता नाम घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
नामे तारिले अपार |
महापापी दुराचारी ||
घेता नाम घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
वाल्या कोळी ब्राम्हहात्यारी |
नामे तारिला निर्धार ||
घेता नाम घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
सेना बैसला निवांत |
विठ्ठल नाम उच्चारित ||
घेता नाम घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें