दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला लिरिक्स - Dukhavu Nako Re Kadhi Manasa Tujhya Tya Aai Bapala Lyrics

दुखवू नको रे कधी माणसा तुझ्या त्या आई बापाला लिरिक्स

तुझे भगवंत आहे रे 
आधी दर्शन तु घ्यावे ते
जन्म देणा-या आई बापा, 
माणसा जाणूनी तु घे

कर माय पित्याची सेवा, 
आठवुनी त्या पुंडलिका
दुखवू नको रे कधी माणसा, 
तुझ्या त्या आई बापाला
आई बापाला आई बापाला

तुझ्यासाठीच आईने 
मांडीचा पाळणा केला
तुला रडतानी पाहूनी, 
बाप तो धाऊनी आला
तुला उदरात नऊ महिने
 ठेविलें वेड्या
तुझ्यासाठीच मातेने 
दुख ते साहिले वेड्या
छातीशी तुला बघ धरले, 
अमृतरूपी दूध प्याला
दुखवू नको रे कधी माणसा, 
तुझ्या त्या आई बापाला

तुला बसवूनी पाटावर, 
आईने घास भरविला
धरूनी बोट बापाने 
सोडिले शाळेला
शिकूनी साहेब मोठा, 
धनी धनवान झाला तु
आणि विसरून आई बापा, 
नित्य अपमान केला तु
मायेच्या अंकुरातून 
बघ जन्म तुझा रे झाला
दुखवू नको रे कधी माणसा, 
तुझ्या त्या आई बापाला

लगीन केले ते थाटाने, 
घरी सून लाडकी आली
आई बसली दाराशी, 
सून ती मालकिन झाली
नको अपशब्द बोल रे, 
आहे आई बाप मोलाचे
घाव ह्रदयवरती पडती 
तुझ्या त्या व्यर्थ बोलाचे
जाँनीत धुंध का झाला, 
विसरूनी त्या ऊपकाराला
दुखवू नको रे कधी माणसा, 
तुझ्या त्या आई बापाला

ऊन येता तुझ्या डोही, 
पदर आईने ठेविला
तुला कुरवाळनी पित्याने 
जीव लाविला
जर तुला लागली भुक, 
आई रडली तुझ्यासाठी
आता झाली आई निर्बल, 
शाप निघतो तुझ्या ओठी
कर्तव्य विसरला जर तु, 
काय अर्थ तुझ्या जीवनाला?
दुखवू नको रे कधी माणसा, 
तुझ्या त्या आई बापाला

कर माय पित्याची सेवा, 
आठवुनी त्या पुंडलिका
दुखवू नको रे कधी माणसा, 
तुझ्या त्या आई बापाला

Vitthalache Abhang Bhakti Bhajan Song

 Song  :- Dukhavu Nako Re Kadhi Manasa Tujhya Tya Aai Bapala

 Singer:- Sanjay Savant

 Lyrics  :-Sagar Pawar


टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

शिव जी के भजन लिरिक्स - Shiv Ji ke Bhajan lyrics ( Bhole Nath ke Bhajan List )

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics