माऊली विठ्ठल माऊली लिरिक्स - Mauli Vitthal Mauli Lyrics
माऊली विठ्ठल माऊली लिरिक्स
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
मोकळं आभाळ पंढरीची वाट
चालू लागली पाऊलं
नाम गोड ओठी माऊली माऊली
अंतरी भेटीची चाहूल
निघाली पाऊले दर्शनी
ध्यास लागला पंढरी
आस या उरात दाटली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली विठ्ठल माऊली
बाप बंधू तूच आई तूच माझी
सोबती अखंड माझ्या कृपा हि तुझी
चरणांशी सारं तुझ्या जीवन माझं
गाईन मी पंढरीराया तुझंच नाम
तेजाची मजवरी तुझी छत्रसावली
उभा जन्म तुझिया पाऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली विठ्ठल माऊली
सोहळा आनंदाचा सजला वाळवंटी
बळ दिलं देवा तू रं गाण्या खुळ्या कंठी
काय भक्त पुंडलिकांची थोर पुण्याई
विटेवरी उभी माझी सावळी विठाई
चंद्रभागेच्या तीरी युगे युगे तो उभा
राणा त्रैलोक्याचा भूवरी
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली विठ्ठल माऊली
चाले वाखरीला खेळ नाद घुमतो गजर
टाळ मृदूंगात वैष्णव बेभान हा
कुणी खेळतो फुगडी कुणी करितो वंदन
त्याच्यामंदी माझ्या पंढरीचा तो कानडा
कुठे वाजवीशी टाळ कुठे वाजवीशी वीणा
वैष्णवांच्या मैफिलीत विठू तू दंगला
ऐक माझ्या बा विठ्ठला साऱ्या तुझ्या सोहळ्यात
जीव तुझ्या रंगी रंगून झाला सावळा
पांडूरंग हरी गजर. . .
Vitthal Bhagwan bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें