यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल लिरिक्स - Yashode Gharakade Chal Mala Jeu Ghal Lyrics

यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल लिरिक्स

यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल || धृ ||

सध्या गव्हाची पोळी लाटी | 
मला पुरणपोळी करून दे मोठी |
नाही यादवीत गुळासाठी | 
मला जेवू घाल || १ ||

तूप लावून भाकर करी | 
वांगे भाजून भरीत करी |
वर कांद्याची कोशिंबिरी | 
मला जेवू घाल || २ ||

आई ग खडे साखरेचे खडे | 
लवकर मला करून दे वडे |
बाळ स्फुंद स्फुंदोनि रडे | 
मला जेवू घाल || ३ ||

आई लहानच घे गे उंडा | 
लवकर भाजून दे मांडा |
लांब गेल्या गाईच्या झुंडा | 
मला जेवू घाल || ४ ||

आई मी खाईन शिळा घांटा | 
दह्याचा करून दे मठ्ठा |
नाही माझ्या अंगी ताठा | 
मला जेवू घाल || ५ ||

भाकर बरीच गोड झाली | 
भक्षुनि भूक हारपली |
यशोदेने कृपा केली | 
मला जेवू घाल || ६ ||

आई मी तुझा एकुलता एक | 
गाई राखितो नऊ लाख |
गाई राखून झिजली नख | 
मला जेवू घाल || ७ ||

नामा विनवी केशवासी | 
गाई राखितो वनासी |
जाऊन सांगा यशोदेशीं | 
मला जेवू घाल || ८ ||

यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल लिरिक्स

Krishna Cha Marathi Gavlan Bhakti Bhajan Song

 Song  :- Yashode Gharakade Chal Mala Jeu Ghal

 Singer:- 

 Lyrics  :-

टिप्पणियाँ

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स - Vitthalache Abhang Marathi lyrics

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics