आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव लिरिक्स - Aalandi He Gav Punyabhumi Thav Lyrics
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव लिरिक्स
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ।दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
चौर्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा ।
तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव |
स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
नामा म्हणे देवा चला तया ठाया |
विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
Marathi Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें