कोटी कोटी रुपे तुझी लिरिक्स - Koti Koti Rupe Tujhi Lyrics
कोटी कोटी रुपे तुझी लिरिक्स
कोटी कोटी रुपे तुझी,कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला,
कुठे कुठे शोधु तुला,
तुझे अनंत देव्हारे
बीज अंकुरे ज्या ठायी,
बीज अंकुरे ज्या ठायी,
तिथे तुझा वास
तुझा स्पर्ष आणुन देतो,
तुझा स्पर्ष आणुन देतो,
फुलाला सुवास
चराचरा रंगवीशी,
चराचरा रंगवीशी,
रंग तुझा कोणता रे
कधी दाह ग्रीष्माचा तू,
कधी दाह ग्रीष्माचा तू,
कधी मेघ ओला
जनी निर्जनीही तूझा,
जनी निर्जनीही तूझा,
पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा
तुझी खूण नाही ऐसा
गाव तरी कोणता रे
खरे रूप देवा तूझे,
खरे रूप देवा तूझे,
कोणते कळेना
तूच विटेवरी,
तूच विटेवरी,
तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा
तुला आळवाया घ्यावा
शब्द तरी कोणता रे
Marathi Abhang Bhakti Bhajan Song
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें