बसले मी होते रंग महाली गवळण लिरिक्स - Basale Mi Hote Rang Mahali Gavlan Lyrics
बसले मी होते रंग महाली गवळण लिरिक्स
बसले होते मी रंग महाली |आरसे लाविले चार ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || धृ ||
येता जाता रोखून पाहता |
वाईट तुमची चाल ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || १ ||
पलंगी मी केली सेज फुलांची |
परिमळ सुगंध घ्या ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || २ ||
तुमच्या चरणाची झाले मी दासी |
एक वेळ दर्शन द्या ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || ३ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने |
मोक्ष पदासी न्या ||
हरी माझ्या मंदिरी कधीतरी या || ४ ||
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें