कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण लिरिक्स - krishna Tula Mi Takid Karite Marathi gavlan lyrics
कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण लिरिक्स
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
गवळ्याघरी बोभाट उठला ।
माठ दह्याचे फोडू नको रे ॥१॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
रागीट तुझा पिता नंद
मार तयाचा खाऊ नको रे ॥२॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
आली गौळण कपटी राधा,
तिच्या घरात तू जाऊ नको रे ॥३॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
पाळण्यात घालूनी झोके देते,
आता मुला, तू रडू नको रे ॥४॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
वरद्या वांकड्या पेंद्या सुदामा,
ह्यांच्या डावामध्ये खेळू नको रे ॥५॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
नामा म्हणे पतित पावना,
ह्यांच्या नामा तू विसरू नको रे ॥६॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
krishna Tula Mi Takid Karite Marathi gavlan Lyrics
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List)
|










Chan
जवाब देंहटाएंMst
जवाब देंहटाएंसूप
जवाब देंहटाएंसुपर
नाद करायचा नाय
जवाब देंहटाएंखूपच छान
जवाब देंहटाएंDinesh
जवाब देंहटाएंखूपच छान.लहानपणी मैत्रिणीने गायले होते.कडवी आठवत नव्हती.खूप खूप आनंद मिळाला.🙏
जवाब देंहटाएं