पदर फाटला कसा अंबळ सुटला कसा लिरिक्स -Padar Fatala Kasa Ambad Sutla Kasa Lyrics
पदर फाटला कसा अंबळ सुटला कसा लिरिक्स
पदर फाटला कसा, अंबाडा सुटला कसातुझ्या दुधाचा माठ, सांग फुटला कसा || धृ ||
कुंभाराने तो नक्षीदार घडविला
किती कष्टाने होता ग मढविला
कोण भेटला कसा तुला झटला कसा
तुझ्या दुधाचा माठ, सांग फुटला कसा || १ ||
तुला छेडाया कोण गडे झटला ग
जरीचा शालू तुझा कसा भिजला ग
डाव साधला कसा माल लुटला कसा
तुझ्या दुधाचा माठ, सांग फुटला कसा || २ ||
अबोला धरूनी वेड अशी पांघरू नको
तू मनातल्या मनात अशी घाबरू नको
साऱ्या गोकुळी याचा बोभाटा सुटला कसा
तुझ्या दुधाचा माठ, सांग फुटला कसा || ३ ||
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |










Purn taka ho
जवाब देंहटाएं