जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा लिरिक्स - Jai Tu Jai Deva Sadashiva Aarti Mahadeva Lyrics

जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा लिरिक्स

जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा, 
जय तू जय देवा ।।धृ ।।

महादेव निघाले शिकारी ढवळ्या नंद्यावरी, 
महादेव निघाले ।।

जीनबा त्याहीचा सोनेरी लगाम कारागिरी, 
जय तू जय देवा ।।

जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा, 
जय तू जय देवा ।।धृ ।।

चार बाई सडका सोडोनी हिंडता राणोरानी, 
चार बाई सडका ।।

गीरजा एकली गुंफेत उदास तिचे चित्त, 
गिरजा एकली ।।

तेथे देव नांदतो हा माळी, धनाचा गवळी, 
तेथे देव नांदतो ।।

धन गवळी धनात, मोतिशेष पाण्यात, 
धन गवळी धनात ।।

धन तू धनाचा, धन गवळी, गायी म्हशीं वाडे भरी, 
धन तू धनाचा ।।

गायी म्हशीन भर वाडे भक्त देतील झाडे, 
गायी म्हशीन ।।

काशी आमुची गुरु माय वंदीन तिचे पाय, 
काशी आमुची ।।

धु धु नागाचा धूनकार गरजले अंबर, 
धु धु नागाचा ।।

आडवी आहेसे बेल नदी, सूर्यासमोर वाहे, 
आडवी आहेसे ।।

पांचा दिवसाची पंचमी आली हो नागेश्वरा, 
पांचा दिवसाची ।।

फुलोरे बांधले अवसरी, आनंद घरोघरी, 
फुलोरे बांधले ।।

कापूर जळतो मणावरी नागाच्या दरबारी, 
कापूर जळतो ।।

म्होरका पूरभा स्वयंवर देवाच्या वाटेवर, 
म्होरका पूरभा ।।

ओटा बांधला चौफेर, मंधी वडाचे झाड, 
ओटा बांधला ।।

जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा, 
जय तू जय देवा ।।धृ ।।

जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा लिरिक्स मराठी 
Jai Tu Jai Deva Sadashiva Aarti Mahadeva Lyrics Marathi 

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

नये भजन आप यहाँ से देख सकते है

ज़्यादा दिखाएं

लेबल

ज़्यादा दिखाएं

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

माता रानी के भजन लिरिक्स - Mata Rani Bhajan List - नवरात्रि स्पेशल देवी भजन लिस्ट

हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची लिरिक्स - He Bholya Shankara Awad Tula Bela chi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani Marathi Lyrics