कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स - Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics
कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स
कशाला काशी जातो रे बाबा !कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।
संत सांगती ते ऐकत नाही,
इंद्रियाचे ऐकतो ।
कीर्तनी मान डोलवितो परी,
कीर्तनी मान डोलवितो परी,
कोंबडी,बकरी खातो !।१।
वडील जनाचे श्राध्द कराया,
गंगे मध्ये पिंड देतो ।
खोटा व्यापार जरा ना सोडी,
खोटा व्यापार जरा ना सोडी,
देव कसा पावतो ।।२।।
खांदी पताका,तुळसी गुळ्यामधे,
घडी-घडी टाळ वाजवितो ।
गरीब-जनांची दया ना चित्ती,
गरीब-जनांची दया ना चित्ती,
दानासी हात आवरतो ! ।।३।।
झालेले मागे तुझे पाप धुवाया,
गंगेत धावुनी न्हातो ।
तुकड्या म्हणे, फिरू नको व्यर्थ ,
तुकड्या म्हणे, फिरू नको व्यर्थ ,
काम तुला लाभतो ।।४।।
कशाला काशी जातो कशाला पंढरी जातो लिरिक्स - Kashala kashi Jato Kashala Pandhari Jato Lyrics
Bhakti Bhajan Song Details
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें