अहा रे सांवळीया कशी वाजवली मुरली लिरिक्स - Aha Re Savaliya Kashi Vajavali Murali Lyrics
अहा रे सांवळीया कशी वाजवली मुरली लिरिक्स
अहा रे सांवळीया कशी
वाजवली वाजवली मुरली
अकल्पित पडला कानीं |
विव्हळ झालें अंत:करणी |
विव्हळ झालें अंत:करणी |
मी घर धंदा विसरलें
अहा रे सांवळीया कशी
वाजवली वाजवली मुरली
मुरली नोहे केवळ बाण |
तिनें हरिला माझा प्राण |
संसार केला दाणादीन |
संसार केला दाणादीन |
येऊनि हृदयी संचरीली |
अहा रे सांवळीया कशी
वाजवली वाजवली मुरली
तुझ्या मुरलीचा सूरतान |
मी विसरलें देहभान |
घर सोडोनी धरिलें रान |
घर सोडोनी धरिलें रान |
मी वृंदावना गेलें |
अहा रे सांवळीया कशी
वाजवली वाजवली मुरली
एका जनार्दनीं गोविंदा |
पतितपावन परमानंदा |
तुझ्या नामाचा मज धंदा |
तुझ्या नामाचा मज धंदा |
वृत्ति तंव पदीं निवर्तली |
अहा रे सांवळीया कशी
वाजवली वाजवली मुरली
Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें