जाऊ दे घट भरण्या यमुनेला लिरिक्स - Jau De Ghat Bharnya Yamunela Lyrics
जाऊ दे घट भरण्या यमुनेला लिरिक्स
जाऊ दे घट भरण्या यमुनेलामला रे अडवू नको नंदलाला ||
मथुरेचा बाई अवघड घाट
मथुरेचा बाई अवघड घाट
चढताना माझी दुखतीया पाट ||
जाऊ दे घट भरण्या यमुनेला
डोईवारी माझ्या गोरक्षाचा माठ
मला रे अडवू नको नंदलाला
डोईवारी माझ्या गोरक्षाचा माठ
हळू हळू चढते मी मधुरेचा घाट ||
जाऊ दे घट भरण्या यमुनेला
एका जनार्दनी विनविती राधा
मला रे अडवू नको नंदलाला
एका जनार्दनी विनविती राधा
पाहून राधिका लागे चरणाला ||
जाऊ दे घट भरण्या यमुनेला
मला रे अडवू नको नंदलाला
Krishna chi Marathi Gavalan Bhakti Bhajan गौळण
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें