बाळ सगुण गुणांचें तान्हें गे लिरिक्स - Baal Sagun Gunanche Tanhe Ge Lyrics
बाळ सगुण गुणांचें तान्हें गे लिरिक्स
बाळ सगुण गुणांचें तान्हें गेबाळ दिसतें गोजिरवाणें गे |
काय सांगतां गाऱ्हाणे गे |
गोकुळींच्या नारी ||धृ||
श्रीरंग माझा वेडा गे |
याला नाहीं दुसरा जोडा गे |
तुम्ही याची संगत सोडा गे |
गोकुळींच्या नारी ||1||
पांच वर्षाचें माझें बाळ गे |
अंगणी माझ्या खेळे गे |
कां लटिकाची घेतां आळ गे |
गोकुळींच्या नारी ||2||
सांवळा गे चिमणा माझा |
गवळणीत खेळे राजा |
तुम्ही मोठ्या ढालगजा गे |
गोकुळींच्या नारी ||3||
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे |
आळ घेतां या गोपाळा गे |
तुम्ही ठाईच्या वोढाळा गे |
गोकुळींच्या नारी ||4||
तुम्ही लपवूनी याची गोटी गे |
लागतां गे याचे पाठीं गे |
ही एवढीच रीत खोटी गे |
गोकुळींच्या नारी ||5||
तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे |
आळ घेतां शारंगधरा गे |
तुम्ही बारा घरच्या बारा गे |
गोकुळींच्या नारी ||6||
हा ब्रम्हविधीचा जनिता गे |
तुम्ही याला धरुं पाहतां गे |
हा कैसा येईल हातां गे |
गोकुळींच्या नारी ||7||
नामा म्हणे यशोदेशी गे |
हा तुझा हृषीकेशी गे |
किती छळीतो आम्हांसी गे |
गोकुळींच्या नारी ||9||
Krishna Marathi Gavlan Details
🎵 संपूर्ण ५०+ गवळणींची लिस्ट पहा सुमधुर मराठी भक्ती गवळणींचा अप्रतिम संग्रह भगवान श्रीकृष्ण आणि गोपी-राधेचे अलौकिक प्रेम, कान्ह्याची खोडकर रूपे आणि भक्तीचा भाव जागवणाऱ्या अशाच काही लोकप्रिय व मनाला शांती देणाऱ्या गवळणी आम्ही येथे संकलित केल्या आहेत. लोकप्रिय गवळणी (Sample List) |









टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें