उभा कसा राहीला विटेवरी लिरिक्स - Ubha Kasa Rahila Vitewari Lyrics
उभा कसा राहीला विटेवरी
विठूराय कितीसे दूर....
इमानदारांच्या समीप अन्.....
बैमानापासून दूर....
पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....
उभा कसा राहीला विटेवरी.....||धृ.||
अंगी शोभे पितांबर पिवळा....
गळ्यामध्ये वैजयंती माळा.....
चंदनाचा टिळा माथी शोभला....
उभा कसा राहीला विटेवरी.....||1||
चला चला पंढरीला जाऊ....
डोळे भरूनी विठू माऊलीला पाहू....
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला.....
उभा कसा राहीला विटेवरी....||2||
ठेवूनिया दोन्ही करकटी....
उभा हा मुकूंद वाळवंटी.....
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला....
उभा कसा राहीला विटेवरी...||3||
बाळ श्रावण प्रार्थी आता....
नका दूर लोटू पंढरीनाथा....
तव चरणी हा देह सारा वाहिला....
उभा कसा राहीला विटेवरी....||4||
पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला....
उभा कसा राहीला विटेवरी.....
उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग
Ubha Kasa Rahila Vitewari Abhang lyrics in Marathi
Singer :- Priyanka Karanje.
Pakhawaj :- Onkar Pokale.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें